तुलना थांबवा...आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी
तुलना थांबवा... स्वतःची इतरांशी, आपल्या मुलांची इतर मुलांशी, आपल्या बायकोची दुसऱ्याच्या बायकोशी, आपल्या नवऱ्याची इतरांच्या नवऱ्याशी, आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी तुलना थांबवा... एक छोटीशी गोष्ट सांगतो एक कावळा असतो तो खूप सुखी, आनंदी असतो त्याने या आधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो याचा अभिमान असतो. एक दिवस तो पोपटाला बघतो. पोपटाचा तो हिरवा रंग, लाल चोच बघून त्याला वाटते "हा पक्षी किती सुंदर आहे, मी असा का नाही???" तो पोपटाला जाऊन तसे सांगतो देखील. पोपट म्हणतो जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते तोपर्यंत मला सुद्धा असेच वाटायचे की मी किती सुंदर आणि नशीबवान आहे. पण आता वाटत नाही. मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो. तर मोर एका पिंजऱ्यात असतो. कावळा सुद्धा मोराला पाहून म्हणतो," तू किती सुंदर आहेस आणि नशीबवान सुद्धा तुला एवढा छान रंग मिळाला, पिसारा मिळाला." तेव्हा मोर रडवेला होऊन कावळ्याला म्हणतो, "मला तर वाटते सगळ्यात नशीबवान तूच आहेस. फक्त तू असा आहेस की कुणीही तुला पिंजऱ्यात बंद करून...