Posts

Showing posts with the label नृसिंहवाडी संततधार विधी

नृसिंहवाडी संततधार विधी

 श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रीगुरुचरणांवर संततधार अनुष्ठान सोहळा संपन्न होत आहे...!!! नृसिंहवाडी चा संततधार विधी  म्हणजे काय ? असा प्रश्न ब-याच जणांच्या मनात येतो; कारण फक्त नरसोबाच्या वाडीलाच हा विधी संपन्न होतो. श्री क्षेत्र नृसिंह वाडी येथे हा संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो. या वेळेच्या यात्रेदरम्यान संततधार संपन्न होणार आहे. वैशाखवणव्याचा दाह श्री दत्तमहाराजांच्या सुकुमार पाऊलांना होऊ नये म्हणून त्यांच्या मनोहर पादुकांवर प्रथम दत्तदेवस्थान तर्फे सलग आठवडाभर दिवसरात्र जलाभिषेक होत असतो. त्यावेळी नृसिंहवाडीचे पुजारी ३ पाळ्यांत आठ तास पवमानसूक्त, रुद्रावर्तने, पुरुषसूक्त, श्रीगुरुचरित्र पठण करीत असतात. एरवी शेजारती नंतर देवांच्या कट्टयावर जायला परवानगी नसते पण संततधार चालू असताना मध्यरात्रीही भक्त मागील बाजूला अभिषेक चालू असलेल्या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. त्यावेळी पुजारी भक्तांना पादुकांवरील पवित्र तीर्थ देतात. देवस्थानच्या संततधारेनंतर ज्या यजमानांना वैयक्तिक संततधार करायची असेल ते देवस्थानच्या परवानगीने करू शकतात. पूर्वी बरेच यजमान संततधार ...