Posts

Showing posts with the label प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राने परिधान केला 204 कोटींचा नेकलेस

Image
  बॉलिवूडची देसी गर्ल  प्रियांका चोप्रा   सध्या तिच्या ‘सिटाडेल” या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. तिच्या या वेबसीरिजला प्रेक्षकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सीरिजसोबतच प्रियांका चोप्रा दरवर्षी प्रमाणे यंदाच्या मेट गाला या इव्हेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्व चित्रपट उद्योगातील दिग्गजांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. याच इव्हेंटमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत आली ती प्रियांका चोप्रा, जिने 200 कोटींपेक्षा जास्त किमतीचा डायमंड नेकलेस परिधान केला  मेट गाला 2023 या इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्रा काळ्या आणि पांढर्‍या रंगात ऑफ शोल्डर थाई-हाई स्लिट ड्रेसमध्ये दिसली. तिचा हा ड्रेस खूपच सुंदर दिसत होता. या ड्रेससोबत तिनं तिच्या गळ्यात एक सुंदर नेकलेसही घातला होता.  तो डायमंड नेकलेस जितका सुंदर आहे, तितकीच त्याची किंमतही आश्चर्यकारक आहे.  प्रियांकाच्या नेकलेसची किंमत लाखात नाही तर करोडोंमध्ये आहे.