पालखी पंढरपूरला जाते त्या गावांची नावे अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत. आळंदी - पालखी आळंदीतून निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. पुणे - पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. (भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो.) दिवेघाट - नंतर पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अष्टांगयोगाच्या आचार दिव्यातून जावे लागते. https://youtube.com/shorts/YR5-QcNVT1k?feature=share सासवड - वड म्हणजे " सप्तचक्र. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र" या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन...