कशाला जगाचे पोशिंदे होताय… #selflove #farmer #life *4 एकर कांदा 5 रुपये किलोने विकण्यापेक्षा फक्त 1 चं एकर कांदा लावा आणि 100 रुपये किलोने विका !!. *भाज्या 20 गूंठे ऐवजी 5 गूंठेचं लावा !! *4 ऐकर जमीन असेलं तर 2 ऐकरवरंच पेरणी करा !! *2 ऐकर जमीन वर्षभर जमीन पडीक ठेवा,खर्च कमी होईलं !! *2 ऐकर पेरणीमुळे उत्पादन कमी झाले तरी भाव मिळेल,भाव मिळाला की तुमचे उतपन्न ही वाढेलं !! *2 ऐकर पडीक ठेवलेल्या जमीनीचा पोतही वाढेलं,पुढचे पीक भरभरून येईलं !! *वारंवार वर्षभर पिके घेवून,रासायनिक खतांमुळे जमीन क्षारपड होते आहे,जमीनीचा पोत बिघडतो आहे,उत्पादन क्षमता कमी होतं आहे !!. *जास्त लागवड करून स्वतःच स्वतःची अडचण करून घेतातं शेतकरी !!. * बळीराजा,जगाचा पोशींदा या तुमच्या अंगावर घातलेल्या रंगीबेरंगी झूली आहेतं,त्या झूली काढून फेकून द्या,विहीरीत बुडवून टाका,नाहीतर जाळून टाका !! *खालील बाबी का होताहैतं याचाही शांत चित्ताने विचार करा !! ( 1 ) शहरी वर्ग तुमचेचं पिकवलेले स्वस्त: खावून तुमच्यावरचं डोळे वटारतोयं. ( 2 ) बियाणे कंपन्या मोठ्या होतायतं. ( 3 ) रासायनिक खतांच्या कंपन्या मोठ्या होतायतं,...