कशाला जगाचे पोशिंदे होताय…

  कशाला जगाचे पोशिंदे होताय… #selflove #farmer #life

*4 एकर कांदा 5 रुपये किलोने विकण्यापेक्षा फक्त 1 चं एकर कांदा लावा आणि 100 रुपये किलोने विका !!.


*भाज्या 20 गूंठे ऐवजी 5 गूंठेचं लावा !!


*4 ऐकर जमीन असेलं तर 2 ऐकरवरंच पेरणी करा !!


*2 ऐकर जमीन वर्षभर जमीन पडीक ठेवा,खर्च कमी होईलं !!


*2 ऐकर पेरणीमुळे उत्पादन कमी झाले तरी भाव मिळेल,भाव मिळाला की तुमचे उतपन्न ही वाढेलं !!


*2 ऐकर पडीक ठेवलेल्या जमीनीचा पोतही वाढेलं,पुढचे पीक भरभरून येईलं !!


*वारंवार वर्षभर पिके घेवून,रासायनिक खतांमुळे जमीन क्षारपड होते आहे,जमीनीचा पोत बिघडतो आहे,उत्पादन क्षमता कमी होतं आहे !!.



*जास्त लागवड करून स्वतःच स्वतःची अडचण करून घेतातं शेतकरी !!.


*बळीराजा,जगाचा पोशींदा या तुमच्या अंगावर घातलेल्या रंगीबेरंगी झूली आहेतं,त्या झूली काढून फेकून द्या,विहीरीत बुडवून टाका,नाहीतर जाळून टाका !!

*खालील बाबी का होताहैतं याचाही शांत चित्ताने विचार करा !!


( 1 ) शहरी वर्ग तुमचेचं पिकवलेले  स्वस्त: खावून तुमच्यावरचं डोळे वटारतोयं.

( 2 ) बियाणे कंपन्या मोठ्या होतायतं.

( 3 ) रासायनिक खतांच्या कंपन्या मोठ्या होतायतं,

औषध कंपन्या मोठ्या होतायतं.

( 4 ) व्यापारी मोठे होतायतं.

( 5 ) कारखानदार मोठे होतायतं.

( 6 ) अगदी शेतमजूर देखील सुखाने जगत आहेतं.

( 7 ) पण शेतमालक शेतकरी मात्र भिकेला लागलायं !!.


*वरील सर्व लोकं तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून एकांतात फिदीफिदी हसणारी लोकं आहेतं,म्हणून यांचा नाद सोडा !!


*प्रथम आपल्या कुटुंबाला लागणारे वाण जसं भात,तेल,डाळी,भाज्या,कडधान्य,भुईमूग,साखरे ऐवजी गुळ ईत्यादी रोजच्या गरजांची पूर्तता करून स्वंयपूर्ण होवून सम्रृद्ध व्हा !!


*थोडा वेळ लागेलं,खुप तर खुप 5 वर्षे लागतीलं !!


*पण तुम्ही यातून या मुजोर व्यवस्थेने निर्माण केलेल्या आभासी परिस्थितीवर नक्कीचं मात करू शकता !!


*तुमच्याकडे असलेल्या जमीनीपैकी 50% जमीनचं दरवर्षी पेरायची हा निर्णय भारतभर चे शेतकरी लोकांनी ऐकजुटीने घ्या,तुमच्या जीवनात येणारा बदल बघा,आनंदी व्हा !!


*हा बदल करायची वेळ आलेली आहे,50% जमीनचं पेरायची वेळ आलेली आहे !!


*कारण तुम्ही आत्महत्या केली तरी वरील लोकांना तुमची,तुमच्या परिवाराची काळजी,चिंता नाहीये मग तुम्ही कशाला त्यांचे पोशींदे होतायं ??

Comments