Posts

Showing posts from June, 2023

Swamisamarthdarshan Akalkot

Image
 

तुलना थांबवा...आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी

  तुलना थांबवा... स्वतःची इतरांशी,  आपल्या मुलांची इतर मुलांशी,  आपल्या बायकोची दुसऱ्याच्या बायकोशी,  आपल्या नवऱ्याची इतरांच्या नवऱ्याशी,  आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी तुलना थांबवा...  एक छोटीशी गोष्ट सांगतो एक कावळा असतो तो खूप सुखी, आनंदी असतो त्याने या आधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो याचा अभिमान असतो.  एक दिवस तो पोपटाला बघतो. पोपटाचा तो हिरवा रंग, लाल चोच बघून त्याला वाटते "हा पक्षी किती सुंदर आहे, मी असा का नाही???" तो पोपटाला जाऊन तसे सांगतो देखील. पोपट म्हणतो जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते तोपर्यंत मला सुद्धा असेच वाटायचे की मी किती सुंदर आणि नशीबवान आहे. पण आता वाटत नाही.  मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो. तर मोर एका पिंजऱ्यात असतो. कावळा सुद्धा मोराला पाहून म्हणतो," तू किती सुंदर आहेस आणि नशीबवान सुद्धा तुला एवढा छान रंग मिळाला, पिसारा मिळाला." तेव्हा मोर रडवेला होऊन कावळ्याला म्हणतो, "मला तर वाटते सगळ्यात नशीबवान तूच आहेस. फक्त तू असा आहेस की कुणीही तुला पिंजऱ्यात बंद करून...

40 thousand rudrakshy swami samarth frame

Image
  https://youtu.be/JPO7yc1BOMA

हाच तो विठ्ठल आणि हिच ती रखुमाई .....

Image
 थकून भागून घरी यायला त्याला रात्रीचे २ वाजले. रस्त्यात दिव्यांची सोबत करत तो घरी आला, बिचारी ती वाट बघून बघून थकून गेली आणि सोफ्यावर बसल्या बसल्या तिला कधी झोप लागली हे तिला कळाल ही नाही. ह्याने बेल वाजवली, १० मिनिटं झाली कुणी दार उघडलंच नाही. ह्याला भीती वाटू लागली त्या भीतीपोटी ह्याने दारावर जोरात धक्का दिला..तिला त्या आवाजाने जाग आली, तिने दार उघडलं. आधीच कर्तव्याची बोजी पाठीवर घेऊन फिरणारा तो वैतागला होता, दार उघडल्या उघडल्या तो तिच्यावर खेकसलाच "कळत नाही का?, तुला माझ्या कष्टांची किंमतच नाहीये.." वगैरे वगैरे.. ती ही वाट बघून बघून वैतागली होती, ती ही चालू झाली आणि जे नेहमी होत तेच झालं..कर्तव्याच्या बोज्याने आपल्या हातानेच पोट भरलं आणि प्रेमाने जोरात दार आपटत प्रेम झोपी गेलं.   विचार करत करत काहीवेळाने कर्तव्य ही झोपी गेलं.  पहाटे ५ वाजता फोन वाजला म्हणून त्याला जाग आली. समोरून एक चड्डी दोस्त होता..अरे येतोय ना, जायचंय आपल्याला माउलींना सासवड पर्यंत सोडवायला. राग एक खूप मोठी गोष्ट सोबत घेऊन फिरत असतो..त्याच नाव अहंकार. तोच सोबत घेऊन त्याने मित्राला चार शिव्या दिल्या ...

पालखी पंढरपूरला जाते त्या गावांची नावे अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

Image
पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत. आळंदी -   पालखी आळंदीतून  निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो.  पुणे -   पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. (भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो.)  दिवेघाट -   नंतर पालखी   संवत्सर ग्राम उर्फ सासवड   या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी  या अष्टांगयोगाच्या आचार दिव्यातून जावे लागते.  https://youtube.com/shorts/YR5-QcNVT1k?feature=share सासवड -   वड म्हणजे " सप्तचक्र. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र" या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे  सासवडचा   मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन...

Swami samarth majhe Aai

Image
  https://www. instagram.com/reel/CtbP4J6tnrT/?igshid=ZWQyN2ExYTkwZQ==

Swami samarth Darshan

Image
 

माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.

Image
 

माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.

  इंद्रायणी काठावर वैष्णवांची मांदियाळी बघायला मिळाली. मोठ्या भक्ती भावात आणि उत्साहात ज्ञानोबा माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पहाटेपासूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू झाला. विधिवत महापूजा झाल्यानंतर पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले होते. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून वारकरी माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले. ग्यानबा तुकारामाच्या गजराने अवघी आळंदी दुमदुमून गेली होती. प्रस्थानावेळी मुख्य ४७ दिंड्यामधील वारकरी, टाळकरी, ग्यानबा तुकारामाच्या तालावर ठेका धरला होता. टाळ मृदंगाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले. माऊलींची पालखी श्री क्षेत्र आळंदीमधील गांधीवाडा येथील आजोळघरी मुक्कामी असेल.

माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.

Image
                                   माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.