Posts
माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.
- Get link
- X
- Other Apps
इंद्रायणी काठावर वैष्णवांची मांदियाळी बघायला मिळाली. मोठ्या भक्ती भावात आणि उत्साहात ज्ञानोबा माऊलीच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पहाटेपासूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू झाला. विधिवत महापूजा झाल्यानंतर पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले होते. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून वारकरी माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी झाले. ग्यानबा तुकारामाच्या गजराने अवघी आळंदी दुमदुमून गेली होती. प्रस्थानावेळी मुख्य ४७ दिंड्यामधील वारकरी, टाळकरी, ग्यानबा तुकारामाच्या तालावर ठेका धरला होता. टाळ मृदंगाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले. माऊलींची पालखी श्री क्षेत्र आळंदीमधील गांधीवाडा येथील आजोळघरी मुक्कामी असेल.
कशाला जगाचे पोशिंदे होताय…
- Get link
- X
- Other Apps
कशाला जगाचे पोशिंदे होताय… #selflove #farmer #life *4 एकर कांदा 5 रुपये किलोने विकण्यापेक्षा फक्त 1 चं एकर कांदा लावा आणि 100 रुपये किलोने विका !!. *भाज्या 20 गूंठे ऐवजी 5 गूंठेचं लावा !! *4 ऐकर जमीन असेलं तर 2 ऐकरवरंच पेरणी करा !! *2 ऐकर जमीन वर्षभर जमीन पडीक ठेवा,खर्च कमी होईलं !! *2 ऐकर पेरणीमुळे उत्पादन कमी झाले तरी भाव मिळेल,भाव मिळाला की तुमचे उतपन्न ही वाढेलं !! *2 ऐकर पडीक ठेवलेल्या जमीनीचा पोतही वाढेलं,पुढचे पीक भरभरून येईलं !! *वारंवार वर्षभर पिके घेवून,रासायनिक खतांमुळे जमीन क्षारपड होते आहे,जमीनीचा पोत बिघडतो आहे,उत्पादन क्षमता कमी होतं आहे !!. *जास्त लागवड करून स्वतःच स्वतःची अडचण करून घेतातं शेतकरी !!. * बळीराजा,जगाचा पोशींदा या तुमच्या अंगावर घातलेल्या रंगीबेरंगी झूली आहेतं,त्या झूली काढून फेकून द्या,विहीरीत बुडवून टाका,नाहीतर जाळून टाका !! *खालील बाबी का होताहैतं याचाही शांत चित्ताने विचार करा !! ( 1 ) शहरी वर्ग तुमचेचं पिकवलेले स्वस्त: खावून तुमच्यावरचं डोळे वटारतोयं. ( 2 ) बियाणे कंपन्या मोठ्या होतायतं. ( 3 ) रासायनिक खतांच्या कंपन्या मोठ्या होतायतं,...
प्रियांका चोप्राने परिधान केला 204 कोटींचा नेकलेस
- Get link
- X
- Other Apps

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल” या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. तिच्या या वेबसीरिजला प्रेक्षकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सीरिजसोबतच प्रियांका चोप्रा दरवर्षी प्रमाणे यंदाच्या मेट गाला या इव्हेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्व चित्रपट उद्योगातील दिग्गजांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. याच इव्हेंटमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत आली ती प्रियांका चोप्रा, जिने 200 कोटींपेक्षा जास्त किमतीचा डायमंड नेकलेस परिधान केला मेट गाला 2023 या इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्रा काळ्या आणि पांढर्या रंगात ऑफ शोल्डर थाई-हाई स्लिट ड्रेसमध्ये दिसली. तिचा हा ड्रेस खूपच सुंदर दिसत होता. या ड्रेससोबत तिनं तिच्या गळ्यात एक सुंदर नेकलेसही घातला होता. तो डायमंड नेकलेस जितका सुंदर आहे, तितकीच त्याची किंमतही आश्चर्यकारक आहे. प्रियांकाच्या नेकलेसची किंमत लाखात नाही तर करोडोंमध्ये आहे.