गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14 Marathi
॥ गुरूचरित्र ॥ ॥ अध्याय 14 वा ॥ सायंदेवाचे प्राणसंकट टळले श्री गणेशाय नमः॥ नामधारक सिध्दाला म्हणाला, ‘‘ हे योगीश्वरा, श्रीगुरू नृसिंह सरस्वतीनी उदरशुल ब्राम्हणाला याधी मुक्त केले, त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा.’’ सिध्द म्हणाला,‘‘श्रीगुरूंनी सायंदेवाची सेवा स्विकारली. त्याचा भक्तीभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याला ‘तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरूभक्त जन्माला येतील’ असा आशीर्वाद दिला.’’ सायंदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणला,‘‘गुरूदेव, आपला महिमा अगाध आहे. तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा, अखंड राहो, माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो. त्यांना सद्गती प्राप्त होवो. पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे. मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राम...